मागील वार्षिक कार्ययोजना मध्ये स्पर्धेत टिकून राहण्याकरिता बँकेने CBS/कोअर बँकिंग मध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची अंमल बजावणी करण्यात आलेली आहे. सार्वजनीक व खाजगी बँकांबरोबर स्पर्धा करण्यासाठी नवनवीन माहिती व तंत्रज्ञान अवगत करणे महत्वाचे असते.म्हणून आपल्या बँकेने नांदेड मध्ये सर्व प्रथम कोअर बँकिंग प्रणालीचा (CBS)चा अवलंब केला असून बँकेने आर. बी. आय.चे मान्यता प्राप्त BSG IT Soft PVT LTD कंपनी चे सॉफ्टवेअर घेतले आहे. त्यामुळे ग्राहकांना आपले व्यवहार कोणत्याही शाखेतून करणे सोयीस्कर झाले आहे. तसेच बँकेने आपले स्वतःचे डाटा सेंटरची उभारणी केली आहे . विशेषत: नांदेड जिल्ह्यातील व ईतर जवळील लहान लहान बँका स्वतः डाटा सेंटर उभारू शकत नाही किंवा एवडा मोठा खर्च करू शकत नाहीत त्यामुळे त्या लहान बँकांना शंकर नागरी सहकारी बँकेच्या डाटा सेंटरचा उपयोग होऊ शकेल म्हणजेच "एक मेका साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ " असा बंकेचा उद्देश साध्य होऊ शकेल . तसेच बँकेला IFSC Code व MICR Code(मायकर कोड) स्वातंत्ररित्या प्राप्त झालेला आहे. व बँकेने आपल्या ग्राहकांना SMS Alert बँकिंग सुविधा प्रधान केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना रोजच्या दैनंदिन व्यवहाराची माहिती SMS द्वारे प्राप्त होईल तसेच मागील कार्ययोजनेनुसार बँकेने आपल्या ग्राहकांना RTGS,NEFT,Sales Tax,Income Tax,Service Tax,Professional Tax च्या चालान भरण्याची सुविधा बँकेने देऊन आपल्या इतर उत्पन्नामध्ये वाढ केलेली आहे. तसेच ग्राहकांना या या वार्षिक कार्ययोजना मध्ये भारतातील कोणत्याही ATM` द्वारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून dili aahe.बँकेने कोअर बँकिंग प्रणालीमध्ये प्रवेश केला असल्यामुळे बँकेच्या व्यवसायात निश्चित वाढ झाली आहे.परंतु याची सर्वात मोठी जबाबदारी कर्मचारी व अधिकारी वर्गावर आहे. कारण या वार्षिक कार्ययोजनामध्ये बँक व्यवसाय वाढ व ग्राहक सेवा यावर कटाक्षाने भर देणार आहे.हे केले तर बँकेची उन्नती व प्रगती होईल.
बँकेने लोहा अर्बन बँक आपल्या बँकेमध्ये विलीनीकरण करून ठेवीदारांच्या नागरी बॅंकेवरील विश्वास कायम ठेवून ती शाखा अजून उत्कृष्ट प्रगती पथावर आहे.तसेच मा.संचालक मंडळ यांच्या मंजुरीनुसार साई अर्बन को-ओप बँक लि.हद्गावाचे आपल्या बँकेमध्ये विलीनीकरण झाले आहे . कमवायला आणि टिकवायला अत्यंत अवघड गोष्ट म्हणजे ठेवीदारांचा विश्वास होय.आजच्या परिस्तिथी मध्ये ठेवीदारांचा विश्वास मिळवणे हि एक महत्वाची गोष्ट आहे.व ती बँकेने प्राप्त केली आहे.कारण शंकर परिवारामध्ये छोटे-छोटे ,ठेवीदार निवृत्त ठेवीदार(Senior Citizein) यांच्या संखेत भरपूर वाढ झाली आहे व आपली बँक पुढील काळामध्ये 300 कोटी ठेवीकडे प्रस्थान करीत असून या सर्व ठेवीदारांचा विश्वास कायम ठेवण्याकरिता मा.संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांना अधक परिश्रम घेणे आवशक आहे तसेच ठेवीदारांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच पुढील प्रत्येक निर्णय,कृती,खर्च,कर्ज मंजुरी करणे आवशक आहे. अहवाल वर्षात बँकेने नवीन ठेव योजना काढलेल्या असून त्याला उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. त्या मध्ये " SNS ९४९ Days-7.25% व्याजदर व " SNS ५०५ Days-7% व १६० Days-१०% तसेच ग्राहकांच्या आग्रहास्तव बँकेने दीर्घ मुदती दाम दुप्पट व दाम तिप्पट ठेव योजना व सिनियर सिटीझनला ०.५०% ज्यादा व्याज अशा योजना काढलेल्या आहेत.वरील योजनेचे शाखेला उद्दिष्टे दिलेली असून व पुढील वर्षात (२०१५ - २०१६) ठेवी 305.50 कोटी कर्ज 219.50 कोटी ढोबळ नफा 1 कोटी 94 लाख , व जास्तीत जास्त बचत व चालू खाते उघडणे, भाग भांडवल मध्ये वाढ करणे व नेट एन.पी.ए. चे प्रमाण ०% ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.तसेच इतर उत्पन्नामध्ये वाढ करण्याकरिता बँक प्रयत्नशील असून या पुढील काळाकरिता आपणा सर्वाना सक्षम राहणे गरजेचे आहे.वरील उद्दिष्ट पार करण्याकरिता निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो.
|